मु.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सेट परिक्षेत यश

0
जळगाव ;-  सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्यातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सेट परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात मु.जे (स्वायत्त) महाविद्यालयाच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
यात जया मनोज नाहाटा, (कॉमर्स), संजय धर्मा नाईक( राज्यशास्त्र), तथागत मनोहर सुरवाडे (इतिहास), जीवन मनोहर भंगाळे( भूगोल), धीरज राजेंद्र पाटील( भूगोल) विशाखा राजेश पाटील( भूगोल),जोती प्रवीणचंद्र पाटील( अर्थशास्त्र), उझमा नाझ शेख इकबाल (लाईफ सायन्स, प्राणीशास्त्र), शुभांगी निंबाजी जाधव( केमिकल सायन्स), सागर अशोक पाटील, राहुल प्रकाशश्चंद्र सपकाळे, सुप्रिया बाबुराव गव्हाणे, ऐश्वर्या वाणी( बाॅटणी),  भूषण लक्ष्मण शार्दूल( स्टॅस्टिक्स), छोटू मावची, प्रिया ब्राम्हणे( समाजशास्त्र), गौरव आराध्य, यज्ञश  बाविस्कर( केमिकल सायन्स) दीपाली विजय बऱ्हाटे(गणित) यांनी यश संपादन केले.
  त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे, डॉ.के.जी. खडसे, प्रा. वाय. एस.सैदाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.