धोनीचा हुक्का पिताना VIDEO VIRAL; चाहत्यांना धक्का

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा मोठा चाहता वर्ग आहे. एक आदर्श म्हणून धोनीकडे पहिले जाते. आता धोनीच्या एका व्हिडीओने सध्या त्याचा चाहता वर्ग बुचकळ्यात पडलाय.  गेल्या काही दिवसांपासून दुबईत सुट्टी साजरी करत आहे. नव्या वर्षानिमित्त धोनी दुबईत होता. धोनी सोशल मीडियावर फारसा सक्रीय नसला तरी त्याचे फोटो, व्हिडीओ मात्र चर्चेत असतात. सध्या धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांनी उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

धोनीचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यात तो हुक्का पिताना दिसत आहे. तोडांतून धूर सोडत असलेला धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. धोनीसोबत इतरही काही जण व्हिडीओत दिसत आहेत. फॉर्मल कोट घातलेला धोनी हुक्का पित आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी धक्का बसल्याचं म्हटलंय. मात्र हा व्हिडीओ कुठला आणि नेमका कधीचा आहे हे समजू शकलेलं नाही.

https://x.com/KollyCensor/status/1743666413460685172?s=20

 

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेलीने एकदा म्हटलं होतं की, धोनी तरुण खेळाडूंसोबत बॉन्डिंग बनवण्यासाठी हुक्का सेशन करायचा. जॉर्ज बेली हे २००९ आणि २०१२ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमध्ये खेळले होते. बेली २०१६ मध्ये पुण्याच्या संघातही होते. त्यावेळी धोनीने पुण्याच्या संघाचे नेतृत्व केले होते.

 

जॉर्ज बेली म्हणाले होते की, धोनीला शीशा किंवा हुक्का पिणं थोडं आवडतं. त्याच्या खोलीत नेहमी ते ठेवायचा आणि दरवाजा सर्वांसाठी उघडा असायचा. जेव्हा त्याच्या खोलीत जायचो तेव्हा तिथं तरुण खेळाडू दिसायचे असंही बेली यांनी सांगितलं होतं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.