विहिरीत पडल्यामुळे नऊ वर्षीय बालिकेचा मृत्यू

0

रावेर;-  पाणी भरण्यासाठी गेलेल्या नववर्षीय बालिकेचा पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील लाल माती येथे घडली.

सुरलीबाई रमेश बारेला असे मृत बालिकेचे नाव असून ती लाल माती येथे रमेश बारेला, मनीषा बारेला ,रेणू बारीला असे सर्वजण गावाजवळील दगडू चव्हाण यांच्या शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले होते.

यावेळी मनिषावर रेणू यांनी सुरलीबाई ही पाणी काढत असताना पाय घसरून विहिरीत पडल्याचे सांगितल्यावरून तात्काळ अल्लाउद्दीन तडवी, पोलीस पाटील राजू तडवी व ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून विहिरीतून सुरलीबाई हिचा मृतदेह काढला रावेर ग्रामीण रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.