दारूच्या नशेत पत्नीला मारहाण ; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

विवाहितेला पैशांची मागणी करत दारूच्या नशेत मारहाण करून छळ केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी शनिवारी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील मेहरूण येथील माहेर असलेल्या चेतना भावेश चौधरी यांचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील भावेश नामदेव चौधरी यांच्यासोबत २००३ मध्ये झालेला आहे. लग्नानंतर काही वर्षे संसार व्यवस्थीत सुरू आसतांना भावेश चौधरी याने विवाहितेला माहेरहून पैसे आणावे अशी मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला पती भावेश चौधरी हा दारूच्या नशेत मारहाण करू लागला. तसेच सासू आणि नंदे यांनी देखील विवाहितेला पैशांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती भावेश नामदेव चौधरी, सासू विमल नामदेव चौधरी रा. वाकडी ता. चाळीसगाव आणि ननंद छायाबाई शिवाजी महाले रा. बहाड ता.चाळीसगाव यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ संजय धनगर पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.