मराठा आंदोलक २६ जानेवारीला मुंबईत धडकणार

0

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्याने मुंबईत येण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार २० जानेवारीला अंतरवालीपासून आंदोलनाला सुरुवात होईल, तर २६ जानेवारीला आंदोलक मुंबईतील आझाद मैदानात धडकणार आहेत.

मराठा आरक्षणाची मुंबई वारी. आता संधी, पुन्हा नाही, असे घोषवाक्य आंदोलकांकडून देण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी जरांगे- पाटील यांनी नवे वेळापत्रक जाहीर केले. अंतरवाली येथून २० जानेवारीला सकाळी ९ वाजता मोर्चा मुंबईकडे मार्गक्रमण करेल. दुपारी कोळगाव येथे जेवण होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.