१ ते ५ जूनदरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

0

 

मुंबई : लोकशाही न्युज नेटवर्क –

देशभरात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अंगाची काहीली होत असताना नागरिक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच ३१ मे पासून केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळणार असल्याची दिलासादायक माहिती मिळत आहे. देशात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालं असून राज्यात लवकरच मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान अभ्यासकांकडून वर्तवण्यात येत आहे.

‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ते ५ जूनदरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकण, मराठवाडा या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही ठिकाणी ओढे नदी नाले वाहतील असा अंदाजही दिला आहे. त्यामुळे आता मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितलं.

मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
८ जूननंतर महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असल्याची माहिती डख यांनी दिली. सुरुवातीला राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद,लातूर, बीड परभणी, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, संगमनेर, नाशिक, जालना, यवतमाळ, धुळे जळगाव या भागात १ ते ५ जूनदरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे. तर पू्र्व विदर्भात देखील ६, ७, ९ जून दरम्यान चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, या पावसाच्या आगमनापूर्वी शेतकऱ्यांची त्यांची सर्व शेतीकामे उरकून घ्यावीत, तसेच वादळी वाऱ्याच्या बाहेर पडू नये अशा काळात योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.