जळगावात माळी समाजाचा राज्यस्तरीय उद्योजक मेळावा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

जळगावात  दि. ३० डिसेंबर रोजी माळी समाजाचा राज्यस्तरीय उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाळधी येथील पदमसिद्धी लॉन येथे ठीक १० वाजता कार्यक्रमाला सुरवात होईल. यावेळी राज्यभरातील यशस्वी उद्योजकांची उपस्थिती लाभणार आहे तर उद्योजक मेळाव्यात समाजभूषण, स्मार्ट उद्योजक, कृषी भूषण, आदर्श शिक्षक तसेच इतर पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे.

माळी साम्राज्य व समता विचार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे राज्यस्तरीय उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  या मेळाव्याला राज्यभरातील यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. २०१९ व २०२३ मध्ये झालेल्या मेळाव्यात अनेक तरुण प्रभावित होऊन उद्योग व्यवसायाकडे वळले आहेत.

यावर्षीच्या मेळाव्यात देखील मोठ्या संख्येने तरुण उपस्थित राहतील. यावर्षी देखील अनेक तरुण नोकरीच्या शोधात बेरोजगार होते.  मात्र आता उद्योग व्यवसाय सुरू करून स्वयम रोजगार शोधून उद्योजक होतील असा आशावाद आयोजकांनी व्यक्त केला आहे. सदर मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यकमाचे अध्यक्ष म्हणून जळगाव येथील महिला उद्योजक अर्चना माळी तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्योजक संतोष  इंगळे व  जळगाव जनता बँकेचे वरिष्ठ अधिकारी राजेश महाजन यांच्यासह यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.