टॉवर चौक ते नेहरू चौक रस्त्यावर वाहन पार्क केल्यास होणार कारवाई

0

जळगाव: टॉवर चौकापासून ते नेहरू चौकापर्यंत रस्त्याच्या दुभाजकापासून दोन्ही बाजूला १२ -१२ मीटर अंतरावर महापालिकेने मार्किंग करून पट्टे मारले असून या पट्ट्यांच्या मध्ये कोणीही वाहन पार्क केल्यास त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढून त्या रस्त्याचे सुशोभिकरण करण्यासाठी दोन्ही बाजूला पट्टे मारून तेथे सिमेंट ब्लॉक्स टाकण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार मनपाच्या बांधकाम विभागाकडून टॉवर चौकापासून ते नेहरू चौकापर्यंत रस्त्याच्या दुभाजकापासून १२ मीटर अंतरावर पांढरे पट्ट मारण्यात आले आहेत. या पट्टयांच्या जागी खोदकाम करून सिमेंट ब्लॉक्स तेथे गाडण्यात येत दुभाजकापासून १२ मीटर अंतरावर बसविले सिमेंट ब्लॉक्स आहेत. या सिमेंट ब्लॉक्सपासून रस्त्याच्या मध्ये कोणही वाहन पार्क केल्यास त्या वाहनधारकांवर वाहतूक पोलीस व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच रस्त्यात लावलेली वाहने देखील जमा करण्यात येणार असल्यामुळे टॉवरचौक रस्ता अतिक्रमन मुक्त होऊन नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.