लोकसभा निकालावर लाईव्ह चर्चासत्र

मान्यवरांचा राहणार सहभाग : सखोल विश्लेषण पाहण्याची संधी

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

लोकशाही माध्यम समूह निर्मित ‘लोक लाईव्ह’ तर्फे अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सकाळी ८ वाजेपासून दिवसभर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून या चर्चासत्रात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांचा सहभाग राहणार आहे.

मंगळवार दि. 4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित होणार असून संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागून आहे. क्षणाक्षणाचे अपडेट देत लोकशाही निर्मित ‘लोक लाईव्ह’ निकालावर सखोल विश्लेषण देणार आहे. जळगाव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर या चर्चासत्रात सहभागी होणार असून निवडणूक निकालावर सखोल विश्लेषण करणार आहेत.

जळगाव जिल्हावासियांसाठी ही संधी असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकशाही माध्यम समूहातर्फे करण्यात आले आहे. लोकशाही माध्यम समुहातर्फे यूट्यूब, फेसबुक, वेबसाईट, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम यासह सर्वच सोशल माध्यमांवर थेट प्रसारण केले जाणार आहे.

 

येथे द्या भेट… https://wp.lokshahilive.com

जाणून घ्या संपूर्ण निकालाची अपडेट!!!

Leave A Reply

Your email address will not be published.