Live : उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

0

मुंबई : राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. ईश्वर साक्ष ठेवून आणि संविधानला स्मरून त्यांनी शपथ घेताच शिवतीर्थावर एकच जल्लोष करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राला विधानसभेच्या निकालाच्या ३६ दिवसानंतर मुख्यमंत्री लाभला आहे. उद्धव ठाकरे शपथविधीनंतर जनतेसमोर नतमस्तक झाले.

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यासारख्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत हजारो जण उपस्थित होते.

लाईव्ह अपडेट …
– शिवसेनेचे एकनाथ शिंदेंनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
– शिवसेनेचे सुभाष राजाराम देसाई 
यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी पदाची शपथ घेतली.

 

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

Leave A Reply

Your email address will not be published.