भयानक.. लिफ्ट कोसळून सात मजुरांचा मृत्यू

0

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गुजरातमधील अहमदाबाद येथे लिफ्ट कोसळून सात मजुरांचा मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी आहे.

अहमदाबाद येथे विद्यापीठाजवळ अस्पायर २ (Aspire 2) नावाची एक गगनचुंबी इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी उभारलेल्या लिफ्टमध्ये सातव्या मजल्यावर असताना बिघाड झाला. बिघाड दुरुस्त करत असताना लिफ्ट कोसळली. लिफ्टमध्ये असलेल्या आठ मजुरांपैकी सात जणांचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी आहे.

विशेष म्हणजे एवढा मोठा अपघात झाला तरी विकासकाकडून स्थानिक पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली नव्हती. अपघाताविषयी काही वृत्त वाहिन्यांवर बातमी आल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलीस यांची पथके घटनास्थळी दाखल झाली. विकासकाकडून त्यांना अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.

अहमदाबाद मनपा प्रशासन या प्रकरणी चौकशी करणार आहे. प्रकल्प खासगी विकासकाचा असला तरी लिफ्ट कोसळून अपघात झाल्यावर स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल यांना माहिती देणे आवश्यक होते. पण ही माहिती देणे टाळल्याचे दिसत आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि दोषींवर नियमानुसार कारवाई होईल, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.