कुवेतमध्ये भीषण आग, 40 भारतीयांचा मृत्यू 

0

लोकशाही न्युज नेटवर्क 

 

कुवेतमधून भारतीयांबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. कुवेतमध्ये बुधवारी सकाळी एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून 41 जणांचा मृत्यू झाला. 30 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 40 भारतीय आहेत. कुवेतमधील भारतीय दूतावासाने आगीच्या या दुर्घटनेत 30 भारतीय मजूर जखमी झाल्याची माहिती दिली आहे.

स्थानिक वेळेनुसार, सकाळी 6 च्या सुमारास कुवेतच्या मंगाफ शहरात ही घटना घडली. रॉयटर्सच्या हवाल्याने एका वरिष्ठ पोलीस कमांडरने स्टेट टीव्हीला सांगितलं की, ज्या इमारतीला आग लागली, तिथे कामगारांच्या निवासाची व्यवस्था केली जायची. मोठ्या संख्ये कामगार इथे राहत होते. कुवेतच्या दक्षिणी अहमदी प्रांतामधील मंगाफ येथे सहा मजली इमारत आहे. या इमारतीच्या किचनमध्ये आग भडकली.

दरम्यान अधिकाऱ्यांनी आग का लागली? त्याच्या कारणांचा शोध सुरु केला आहे. या इमारतीत जवळपास 160 लोक राहत होते. एकाच कंपनीचे हे सर्व कर्मचारी होते.

“कुवेतमधील भारतीय दूतावासाने एक इमर्जन्सी हेल्पलाइन नंबर +965-65505246 सुरु केला आहे. सर्व संबंधितांना अपडेटसाठी हेल्पलाइनच्या संपर्कात राहण्याची विनंती केली आहे. दूतावास सर्व शक्य मदत करेल” असं कुवेतमधील भारतीय दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.