नगरदेवळा येथे आजपासून खंडेराव महाराज यात्रोत्सव

0

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क

तालुक्यातील नगरदेवळा व परिसरातील भक्तांचे आराध्य दैवत असलेले तसेच शेकडो वर्षांची परंपरा असलेला येथील खंडेराव महाराज यात्रा उत्सव कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी दि. १६ फेब्रुवारी पासून प्रारंभ झाला आहे.

पहिल्या दिवशी पालखी मिरवणुकीने आठवडाभर चालणाऱ्या या यात्रोत्सवाची सुरूवात झाली असून येथील परिसरातील शेतकरी व कष्टकऱ्यांचे खास आकर्षण म्हणजे तगतराव मिरवणूक व स्थानिक लोककलावंत रतनभाऊ मंडळाचा तमाशा हे दि. १८ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. तसेच जिल्हाभरातील पहेलवानांना आपले कसब दाखविण्याचे हक्काचे ठिकाण असलेला जंगी कुश्त्यांचा कार्यक्रम दि. २० फेब्रुवारी रविवारी पार पडणार असून जोड पाहून बक्षीस देणार आहेत. तसेच कोरोना संबधित सर्व नियमांचे पालन करत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रा उत्सव समितीने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.