चोरट्यांचा शेतशिवाराकडे मोर्चा, शेतातून साहित्य लंपास

0

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

तालुक्यातील घाटपुरी शिवारातील एका शेतातून अज्ञात चोरट्यांनी साहित्य लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.

यासंदर्भात स्थानिक गोपाळनगर भागातील रहिवासी गणेश रामेश्वर भेरडे यांनी 24 मे 2024 रोजी शिवाजीनगर पोस्टेला फिर्याद दिली. त्यामध्ये नमूद केले आहे की, त्यांच्या घाटपुरी शिवारातील गट नं. 29/2 मधील शेताला तारेचे कंपाऊंड असून लोखंडी गेटची जाळी लावलेली आहे व त्याला साखळदांडाने कुलूप लावले आहे. शेतामध्ये विहीर असून पाण्याच्या व्यवस्थेसाठी विद्युत मिटर व संच लावण्यात आलेला आहे. तसेच सिंचन व्यवस्थेसाठी शेतात पिव्हीसी पाईपलाईन टाकलेली आहे व स्प्रींकलर सिस्टीमसाठी सुप्रीम कंपनीचे पिव्हीसी पाईप सुध्दा ठेवलेले होते.

 

22 मे 2024 रोजी सकाळी रोजी शेतीची मशागत करण्यासाठी शेतात गेलो असता गेटचे कुलूप उघडलेले असल्याचे दिसून आले. शेतात पाहणी केली असता 10 फुटाचे 6 पिव्हीसी पाईप अं. किंमत 1200 रुपये तसेच 10 फुटाचे 2 लोखंडी पाईप अं. किंमत 1500 रुपये व इतर साहित्य 500 रुपये असा एकुण 2750 रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे दिसून आले. तरी याप्रकरणी चोरट्याचा शोध घेवून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे तक्रारीत नमूद केले आहे. सदर प्रकरणी पोहेकाँ संदीप टाकसाळ तपास करीत आहेत.*

Leave A Reply

Your email address will not be published.