एकनिष्ठा तर्फे १४ फेब्रुवारी शहिदांना श्रद्धांजली देऊन केली साजरी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

खामगांव; येथील एकनिष्ठा गौ-सेवा रक्तसेवा फाऊंडेशन कडून १४ फेब्रुवारी रोजी वेलन टांईडेचा निषेध करून देशासाठी बलिदान देऊन शहिद झालेल्या विर जवान देश भक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. सर्वप्रथम शहिद भगतसिंग यांच्या पुतळ्याला मालार्पण करून पूजन करण्यात आले व तसेच सामान्य रुग्णालयात गरजु रुग्णांना रक्तदान करण्यात आले.

सुरजभैय्या यादव यांनी विर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकले व तसेच पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या 44 विर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन उपस्थित देश भक्तांना संबोधीत करत काळा दिवस म्हणून साजरा केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा तायडे हे होते.

यावेळी सुरजभैय्या यादव, ग्यानेश सेवक सर, गब्बु गुजरीवाल, सिद्धेश्वर निर्मळ, विकी सारवान , प्रदीप शमी, सोनू कौशल, अजय बोचरे, कृष्णा तायडे, विठ्ठल तायडे, सागर बेटवाल, शंकर संगेले, प्रेम भारसाकळे, राजेंद्र खैरे, यश शर्मा, संजय बेनिवाल, आकाश गोसावी, देवा पाटील, चेतन कदम, महादेव पवार, दिपक शर्मा, लखन सारसर, किशोर लोखंडकार, शिवा जाधव,योगेश तंबोले, कुणा पिवाल,विकी टाक, आशिष शर्मा, सौरभ रिछारिया, लकी आटवले, राजु शर्मा, शुभम टाक, पवन आटवले ,आदीत्य सुसगोहर, योगेश रेठेकर, सुजल गोहर, हर्षल खेडकर, शर्मा आदि लोकांनी हा उपक्रम राबवून शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्यानेश सेवक यांनी केले तर आभार देवा पाटील यांनी मानले. अशी माहिती विक्की सारवान यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.