कलेश्‍वरी आर्टतर्फे श्री समर्थ सुकनाथ बाबा वसतिगृहात “कलेची दिवाळी” कार्यशाळा संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चुंचाळे येथील श्री समर्थ सुकनाथ बाबा वनवासी मुलांचे वस्तीगृह येथे जळगावच्या कलेश्‍वरी आर्टच्या संचालिका तसेच पाळधी येथील जीपीएस  स्कूलच्या कला शिक्षिका, उपक्रमशील कलाकार प्रीती चौधरी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी दिवाळीनिमित्त “कलेची दिवाळी ” हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यशाळेअंतर्गत प्रीती चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पणती रंगवणे व कंदील बनवणे ही कार्यशाळा घेतली. तसेच विद्यार्थ्यांना चित्रकलेची वही, रंगपेटी, कंदीलसाठी लागणारे साहित्य भेट म्हणून दिली. प्रीती चौधरी यांनी आपल्या मनोगतात कलेचे महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले. कोणतीही कला जर आपल्याला अवगत झाली तर आपला छंद ही जोपासला जातो आणि त्याच बरोबर आपल्याला उदरनिर्वाहाचे साधन ही मिळते.

तसेच कलेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले. प्राचार्य व्हि.जी. तेली यांनी प्रीती चौधरी यांचे पुषगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या मनोगतात या शैक्षणिक व मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणार्‍या कार्यक्रमाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वसतिगृहाचे अधिक्षक चंद्रकांत चौधरी यांनी या उपक्रमाचे स्वागत करून भविष्यात असे कार्यक्रम आयोजित करावे अशा शुभेच्छा दिल्या.  एस.बी. गोसावी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  पी. एस. सोनवणे, सुधिर चौधरी, वाय. वाय. पाटील, एस. एस. पाटील, डी. बी. मोरे, एम. आर. चौधरी, शारदा चौधरी यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार शारदा चौधरी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.