जामनेर पोलीसांची धडक कारवाई, लाखोंच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त

एकास केली अटक

0

जामनेर , लोकशाही न्युज नेटवर्क 

अवैध गुटखा वाहतुकीचा सुळसुळाट वाढला असून पोलिसांनी धडक कारवाई केलीय. जामनेर पोलिसांनी चार चाकी वाहनातुन वाहतुक होणारा विमल गुटखा जप्त केला असुन वाहनासह मुद्देमाल आणि आरोपी ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोदवडच्या दिशेने जामनेर शहरात येणाऱ्या एम. एच. १९. बी. जे. ३७७१. या वाहनात अवैध प्रकारचा तसेच बंदी असलेला विमल गुटखा असल्याची गोपनीय माहिती जामनेर येथील पत्रकार प्रदिप गायके यांना मिळाली. प्रदिप गायके यांनी सदर या वाहनाचा पाठलाग करीत जळगाव रोडवर मोठ्या शिताफीने हे वाहन पकडले.

जामनेर पोलीस स्टेशनचे पो. नि. किरण शिंदे यांना याबाबत माहिती देत वाहन जामनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. वाहनात कोंबुन भरलेले १० पोते तसेच लहान पाऊच असलेले पोते जप्त करण्यात आले असुन या जप्त केलेल्या गुटख्याची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे समजते.

अमाप पैसा कमावला

शहरात येणारा गुटखा हा कुणाचा आहे याचा तपास पोलीस करीत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात जामनेर तालुक्यात अवैध गुटखा विक्री होत असुन या धंद्यातुन अमाप पैसा कमवित आहे. तर कित्येकांनी यातुन आपले उखळ पांढरे केले आहे. या कारवाईत पोलिसांनी पवन मोहन गोसावी रा. मुक्ताईनगर या अटक केली आहे.

यांनी केली कारवाई

जामनेर पोलीस स्टेशनचे पो. नि. किरण शिंदे, पो. उप. नि. सागर काळे, तुषार पाटील, चंद्रकांत चिकटे, अतुल पवार, निलेश घुगे, यांच्या सह इतर कर्मचारी यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.