जळगावात ७२ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या 

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

जळगाव शहरातील तुकारामवाडी भागात अशोक मुरलीधर मावळे (वय 72) या ज्येष्ठ व्यक्तीने आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तुकारामवाडी येथील 72 वर्षीय प्रौढाने राहत्या घराच्या छताला गळफास लावून जीवन संपवलं. ही घटना सोमवारी (दि.10) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ते तुकाराम वाडीत पत्नी, मुलगा यांच्यासह राहत होते. त्यांची विवाहित मुलगी पुण्यात राहते. तर मुलगाही नोकरीनिमित्त पुण्यात आहे. अशोक मावळे हे पूर्वी एका वर्कशॉपला काम करायचे. सध्या ते घरीच होते. दरम्यान, सोमवारी सकाळी त्यांनी राहत्या घरी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे कुटुंबियांना लक्षात आले. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.