हद्दपार गुन्हेगार लोखंडी कोयत्यासह जेरबंद

0

 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

२ वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला शहर पोलिसांनी कारवाई करून २६ जून रोजी रात्री ९ वाजता गेंदालाल मिल भागातील भिमा कोरेगाव चौकातून लोखंडी कोयत्यासह अटक केली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत (वय २१, रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार असलेला गुन्हेगार महेश लिंगायत हा गेंदालाल मिल परिसरातील भिमा कोरेगाव चौकात येवून हातात कोयता घेवून फिरत असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने बुधवारी २६ जून रोजी रात्री ९ वाजता गेंदलाल मिल परिसरातून गुन्हेगार महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत याला अटक केली.

दरम्यान त्याच्याजवळील लोखंडी कोयता सुध्दा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रतनहरी गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवार २७ जून रोजी पहाटे ३ वाजता महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.