मुलीला छेडल्याचा संशय, मारहाणीत एकाचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

मुलीची छेड काढण्याच्या संशयावरुन एकाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवार ४ जुलै रोजी तालुक्यातील आसोदा येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलीसांत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

आसोदा गावात भास्कर दगडू भंगाळे (वय ४३) हे आपल्या कुटुंबासह राहतात. गुरुवार ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातील गोकुळ नगर याठिकाणी गेला असता त्याने मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून नागरिकांनी त्याला जाब विचारत मारहाण केली. या मारहाणीमध्ये भास्कर भंगाळे हे गंभीर जखमी झाले.

 

दरम्यान त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले होते. त्यास वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन देवचे यांनी तपासून मयत घोषित केले. या घटनेप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच शासकीय रुग्णालयात येऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.