तरूणावर धारदार सुऱ्याने वार, तिघांना अटक 

सिगारेटवरून झाला होता वाद

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

जळगाव रेल्वेस्थानकाजवळील हनुमान मंदीराच्या मोकळ्या जागेवर सिगारेट ओढणाऱ्यांना हटकल्याचा राग आल्याने एका तरुणाला तीन जणांनी मारहाण करून लोखंडी सुऱ्याने वार करून जखमी केल्याची घटना बुधवारी २६ जून रोजी पहाटे ३ वाजता घडली होती. या  तिघांना गुरूवार २७ जून रोजी रात्री ८ वाजता शहर पोलिसांनी शनीपेठ परिसरातून अटक केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मयूर धमदास सारवान (वय १९), अक्षय मुकेश अटवाल (वय २३) निलेश नरेश हंसकर (वय २३) तिघे रा. शनिपेठ जळगाव असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर आधार सोनवणे हा तरूण कानळदा रोडवरील रोहनवाडी येथे राहतो. बुधवारी २६ जून रोजी पहाटे ३ वाजता ज्ञानेश्वर हा तरूण जळगाव रेल्वेस्थानकाजवळील हनुमान मंदीराच्या मोकळ्या जागेवर बसलेला होता. त्यावेळी अक्षय मुकेश अटवाल रा. शनीपेठ जळगाव मंदीराजवळ सिगारेट ओढत होता. त्यावेळी ज्ञानेश्वरने मंदिराच्या परिसरात सिगारेट ओढणाऱ्या अक्षयला हटकवले. या रागातून अक्षय मुकेश अटवाल यांच्यासह मयूर धमदास सारवान आणि निलेश नरेश हंसकर यांनी ज्ञानेश्वरला बेदम मारहाण केली. तर अक्षय अटवाल याने हातातील लोखंडी सुऱ्याने ज्ञानेश्वर वार करत त्याला जखमी केली.

याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  यानंतर शहर पोलीसांनी गुरूवार २७ जून रोजी रात्री ८ वाजता कारवाई करत तिघांना शनीपेठ परिसरातून अटक केली आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.