निम्न तापी प्रकल्पासाठी मंत्री सी. आर. पाटलांची भेट घेणार : पालकमंत्री 

0

 

धरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

महाराष्ट्रसह जळगाव जिल्ह्यामध्ये असे वातावरण विरोधकांकडून करण्यात आले की या देशांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार जिल्ह्यामधील दोघे जागा एक साईट निवडून येतील. परंतु महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर जळगाव ग्रामीणमध्ये 63 हजाराच्या लीड मिळाला आणि आता महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या जोरावर महायुतीचे सरकार पुन्हा निवडून येईल स्मिताताई वाघ यांनी शेतकऱ्यांसाठी जो निम्न तापी प्रस्ताव आहे केंद्राकडे त्याचा पाठपुरावा करावा जेणेकरून जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा फायदा होईल, असे उद्गार महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

स्मिताताई वाघ यांनी सत्काराला उत्तर देतांना म्हणाल्या, माझ्यासाठी माझे भाऊ गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीच्या ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महिलांनी सहकार्य केलं, मला निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, त्यांच्या मी ऋणात आहे. मी तुमच्या विश्वासाला कधीही तळा जाऊ देणार नाही या 5 वर्षाच्या कार्यकाळात जास्त जास्ती विकास कामे करण्याचा प्रयत्न करेल.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेना जळगाव जिल्ह्याचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांनी सांगितले, स्मिताताई वाघ यांना जळगाव ग्रामीण मधून 63 हजाराच्या लीड मिळाला. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील यांना 1 लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून येतील, असे प्रतिपादन पी एम पाटील सर यांनी केले. धरणगाव येथील वाणी मंगल कार्यालय नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ यांच्या सत्कार आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून स्मिताताई वाघ, भाजपचे जेष्ठ नेते डी जी पाटील, सुभाष अण्णा पाटील, राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, शिवसेनेचा महिला प्रमुख सरिता कोल्हे, प्रमिला रोकडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी डी जी पाटील, सुभाष पाटील यांना सरिता कोल्हे, ज्ञानेश्वर महाजन, नगरसेवक अभिजीत पाटील, यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संजय महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप यांनी मानले कार्यक्रमाला शिवसेना-भाजप राष्ट्रवादी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.