लवकरच गुगल करणार हि सर्व्हिस बंद !

0

नवी दिल्ली ;- आपल्या रोजच्या आयुष्यातील गुगल क्रोम हा अविभाज्य घटक बनला आहे. गुगलने त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवनवीन सर्व्हिस लाँच केल्या आहेत. गुगल मॅप, गुगल पे यासारख्या अनेक सर्व्हिस आज आपण वापरतो.

पण लवकरच गुगल एक सर्व्हिस बंद करणार आहेत. गुगलने लाँच केलेली वीपीएन सर्व्हिस( Google One VPN Service) लवकरच बंद करण्यात येणार आहे. जवळपास 4 वर्षांपूर्वी ही सर्व्हिस लाँच करण्यात आली होती. मात्र, आता कंपनीने अधिकृतरित्या बंद करण्याची घोषणा केली आहे.
एका रिपोर्टनुसार, गुगल वन वीपीएन सर्व्हिस 20 जून 2024 साली बंद करणार आहे. गुगलने ऑक्टोबर 2020मध्ये ही सर्व्हिस लाँच केली होती. गुगल सपोर्ट पेजने दिलेल्या माहितीनुसार, 20 जून 2024पासून गुगल वन वीपीएन सर्व्हिस बंद करण्यात येणार आहे. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, पिक्सल 8 आणि नवीन ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या डिव्हाइसमध्ये इन बिल्ड वीपीएन सिस्टिम देण्यात येत होती. अशातच गुगलकडून अन्य एका वेगळ्या वीपीएन सर्व्हिसवर पैसे खर्च करण्याचा कोणताही विचार नाहीये. त्यामुळं आता VPN सर्व्हिस बंद करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.