पदवीधर मतदार संघ ; 20 उमेदवारांचे 31 नामनिर्देशन अर्ज

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
नाशिक – महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवार दि.12 जानेवारी,2023 रोजी 20 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन पत्र सादर केले असून आत्तापर्यंत 29 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत, अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे.
आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये नितीन नारायण सरोदे,नाशिक व संजय एकनाथ माळी,जळगाव, राजेंद्र दौलत निकम, नाशिक यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. दादासाहेब हिरामण पवार, नाशिक यांनी हिंदूस्तान जनता पार्टी पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. भागवत धोंडीबा गायकवाड यांनी अपक्ष म्हणून दोन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत.
रतन कचरु बनसोडे, नाशिक यांनी वंचित बहुजन आघाडीतून नामनिर्देशन पत्र सादर केले असून डॉ.सुधीर सुरेश तांबे,पनवेल,जि.रायगड यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र अर्ज सादर केले आहेत. पोपटराव सीताराम बनकर,अहमदनगर यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. बाळासाहेब घोरपडे,नाशिक यांनी अपक्ष म्हणून दोन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. अविनाश महादू माळी, नंदूरबार, इरफान मोहमंद इसाक,नाशिक ,सुनिल शिवाजी उदमळे, अहमदनगर यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत.
सुभाष राजाराम जंगले,अहमदनगर व अमोल बाबासाहेब खाडे, अहमदनगर यांनी प्रत्येकी दोन अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. धनराज देविदास विसपुते, धुळे यांनी भारतीय जनता पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. तसेच सत्यजित सुधीर तांबे, अहमदनगर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून व अपक्ष म्हणून असे दोन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. शरद मंगा तायडे, नाशिक यांनी बहुजन समाज पार्टी, नाशिक या पक्षातून दोन नामनिर्देशन पत्रे सादर केले आहेत.
राजेंद्र मधुकर भावसार,धुळे, यशवंत केशव साळवे,नाशिक, धनराज देविदास विसपुते,धुळे, छगन भिकाजी पानसरे, अहमदनगर, अनिल शांताराम तेजा यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केली आहेत. तसेच धनजंय कृष्णा जाधव,अहमदनगर यांनी भारतीय जनता पक्षातून व अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले असून बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक यांनी भारतीय जनता पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत.
दि.10, 11 व 12 जानेवारी,2023 या तीन दिवसात 29 उमेदवारांनी नामनिर्देशन 44 अर्ज सादर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.