Gpay, Phonepe वर ह्या तारखेपासून आकारले जाणार शुल्क..!

0

 लोकशाही, न्यूज नेटवर्क 

 

बदलत्या काळानुसार, युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI सामान्य लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आजकाल,आजकाल अधिकतर लोक कॅशलेस व्यवहार करण्यास जास्त महत्व देतात. नॅशनल पेमेंट (Payment) कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), जे आता UPI चालवते, 24 मार्च 2023 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की UPI वरून व्यापारी व्यवहारांवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) शुल्क लागू केले जाईल. या अधिसूचनेनुसार, जर एखाद्या व्यक्तीने मोबाईल (Mobile) वॉलेटसारख्या प्रीपेड पेमेंट साधनांद्वारे व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे हस्तांतरित केले तर अशा परिस्थितीत त्याला इंटरचेंज शुल्क भरावे लागेल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कार्ड आणि वॉलेट PPI अंतर्गत येतात.

1.1 टक्के इंटरचेंज फी असेल

मिळालेल्या माहितीनुसार 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवरच हे इंटरचेंज शुल्क आकारले जाईल. हे शुल्क साधारणपणे 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या 1.1 टक्के असेल.विशेष म्हणजे, NPCI ने वेगवेगळ्या प्रदेशांसाठी वेगवेगळे इंटरचेंज शुल्क निश्चित केले आहे. कृषी आणि दूरसंचार क्षेत्रात सर्वात कमी इंटरचेंज फी आकारली जाईल. हे शुल्क केवळ व्यापारी व्यवहारांसाठी पेमेंट करणाऱ्या वापरकर्त्यांनाच द्यावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.