चांदीच्या दरात जोरदार घसरगुंडी !

साडेपाच हजारांनी घसरली : सोने 72 हजार तोळ्यावर

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

सराफा बाजारात रोज नवनवीन घटना घडत असून चांदीच्या दरात जोरदार घसरगुंडी होत असून चांदी आता साडेपाच हजारांवर आली आहे. गेल्या आठवड्यापासून चांदीच्या भावात सतत घसरण सुरू असून चांदीत आठशे रुपयांची घसरण होऊन ती 88 हजार 500 रुपये प्रति किलोवर आली आहे.

दोन आठवड्यात तर चांदीचे भाव पाच हजार 500 रुपयांनी कमी झाले आहे. मे महिन्यात चांदीचे भाव सतत वाढत जाऊन चांदीने नवनवीन उच्चांक गाठले. दुसरीकडे सोने मात्र 72 हजार रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे.

दि. 29 मे रोजी तर चांदी 94 हजार रुपये प्रति किलोवर पोहचली होती. त्यानंतर मात्र तिचे भाव कमी- कमी होत गेले. काहीसा चढ-उतार होत असताना 8 जूनपासून तिचे भाव सतत कमी होत आहे. 8 जून रोजी 92 हजार 200 रुपयांवर असलेले चांदीचे भाव 10 जून रोजी 89 हजार 300 रुपयांवर आले. आता पुन्हा 14 रोजी त्यात 800 रुपयांची घसरण झाली व चांदी 88 हजार 500 रुपये प्रति किलोवर आले आहे. 94 हजारांवर गेलेल्या चांदीच्या भावात आता मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तीन दिवसांपासून सोने मात्र 72 हजार रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.