जळगाव शहराच्या विकासासाठी त्वरीत निधी द्या !

मंत्री गिरीश महाजनांना साकडे : माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणेंचे निवेदन

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

शहराचा चौफेर विकास व्हावा या दृष्टीकोनातून राज्य सरकारने पुढाकार घेवून निधी उपलब्ध करुन द्यावा या आशायाचे निवेदन माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक कॉलनी परिसरात उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा पुरविण्यात आल्या असून त्यात रस्ते, गटारी झाल्या आहेत, पण अनेक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते व गटारी होवू शकल्या नाही त्यामुळे अनेक नागरिकांच्या मनपात नेहमीच तक्रारी येत असतात, याचीच दखल घेत मनपाचे माजी महापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना निवेदनाद्वारे 300 कोटींचा निधी मिळावा अशी मागणी केली आहे. जळगाव शहरासाठी भरघोस निधी यापूर्वी देखील मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रत्यनातून मिळाला आहे. यासाठी सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 कोटींचा निधी मिळवून दिला. त्यानंतर शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी मिळवून दिला. त्यातून 42 कोटींचे काम सध्या चालु आहेत. त्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून काँक्रीट रस्त्यांसाठी 100 कोटी प्राप्त झाले व त्यातून रस्त्यांची कामे सुरू आहेत.परंतु शहरातील अनेक कॉलनी परिसरातील रस्त्यांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत व काही परिसरांमध्ये रस्ते सुध्दा झालेले नाहीत. त्यासाठी शहरातील रस्त्यांसाठी 300 कोटींचा निधी मंजुर करुन द्यावा व गटारींची स्थिती खराब असल्याने गटारींसाठी 100 कोटींचा निधी मंजुर करुन द्यावी अशी मागणी केली आहे.

निवेदन देतेवेळी माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, भाजपा महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, लोकसभा प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, माजी उपमहापौर सुनील खडके, भाजपा सरचिटणीस अमित भाटिया, सौरभ लुंकड, डॉ.क्षितिज भालेराव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.