शिरसोलीतील तरुणाला पाच लाखांचा गंडा

0

जळगाव : शिरसोली येथील तरुणाची पाच लाख 20 हजारांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याची घटना बुधवार, 29 मे रोजी उघडकीला आली. याप्रकरणी शनिवार, 1 जून रोजी दुपारी दोन वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन टेलीग्राम धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात शुभम दिलील लांबोळे (27) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. 28 आणि 29 मे रोजी टेलीग्राम धारक असलेले प्रिया शर्मा आणि दिव्या बस्सी असे नाव सांगणार्‍या दोन जणांनी शुभमशी संपर्क साधला. त्याला गुंतवणूक करून अधिकचा पैसे मिळवून देण्याचे सांगून त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळावेळी शुभम करून ऑनलाईन पध्दतीने वेगवेगळ्या बँक खात्यात सुमारे पाच लाख 20 हजारांची रक्कम ऑनलाईन पध्दतीने मागवून घेतले. त्यानंतर नफा व मुद्दलची रक्कम शुभमने मागितली परंतू त्याला उडवा-उडवीची उत्तरे दिली.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शुभम लांबोळे याने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी 1 जून रोजी दुपारी 2 वाजता सायबर पोलीस ठाण्यात टेलीग्राम धारक असलेले प्रिया शर्मा आणि दिव्या बस्सी असे नाव सांगणार्‍या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.