‘दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगाच्या दारी’ ’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी

0

जळगाव;-: दिव्यांग बांधवांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी राज्यभर दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहेत. हे अभियान जळगाव जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावे. अशा सुचना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिल्यात.

हे अभियान जिल्हास्तरावर राबविण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राधिकृत केले असून जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात सदरचे अभियान राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली नुकतीच पार पडली, यावेळी ते बोलत होते.

राज्य शासनाच्यावतीने स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती केली आहे. त्याअनुषंगाने राज्यातील अधिकाधिक दिव्यांग बांधवांना आपल्या तक्रारी, अडचणी मांडण्यासाठी तसेच त्यांना आवश्यक सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा, या उद्देशाने दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने राज्यभर दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना वैश्विक ओळखपत्र (दिव्यांग प्रमाणपत्र) शेत जमिनीशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र अन्य आवश्यक प्रमाणपत्रे प्राप्त करून घेता येणार आहे. याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विजय रायसिंग, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.