अतिरिक्त अर्थसंकल्पात योग्य निर्णय जाहीर करा..!

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे मागणी

0

 

अमळनेर | लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यातील १०२१ महसूली मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करुन सवलती लागू करण्यात आलेल्या असून अमळनेर विधानसभा मतदारसंघ सतत अवर्षण प्रवण क्षेत्र असून खरीप हंगाम २०२३ २४ मध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असूनही दुष्काळ ऐवजी दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहिर केलेल्या मंडळात अमळनेर मतदारसंघाचा समावेश करण्यात आलेला आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना तसेच शेतकरी हिताचे निर्णय जाहिर केले आहेत. त्यातील खरीप पणन हंगाम २०२३ २४ मध्ये कापूस ब सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादेत प्रति हेक्टर ५ हजार रुपयांचे अर्थ सहाय्य जाहिर केलेले आहे.

 

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी खरीप पणन हंगाम, २०२३ २४ करीता १९ हजार २१ महसूल मंडळात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहिर केलेल्या खान्देशातील महसूली मंडळात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे तुटपुंजी अर्थसहाय्य घोषीत केल्यामुळे जे शेतकरी पुर्णपणे मेटाकूटीस आलेला आहे, त्यामुळे धान उत्पादक शेतकरी तुमचे आणि कापूस उत्पादक आम्ही सावत्र आहोत का? अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती असंतोषाची भावना झालेली आहे.

शासनाने दि.२६ मार्च २०२४ अन्वये खरीप पणन हंगाम २०२३-२४ साठी धान / भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी रु.२०,००० हजार या प्रमाणे (दोन हेक्टरच्या मर्यादित) प्रोत्साहनपर राशी देण्याची घोषणा केली आहे.त्या अनुषंगाने धान / भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी रु. ५ हजार ऐवजी प्रति हेक्टरी रु. २०,०००/हजार (दोन हेक्टरच्या मर्यादित) प्रोत्साहनपर अर्थसहाय्य सुरु असलेल्या सन २०२४ २५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात शासनाने करावयाची कार्यवाही ब उपाययोजनाबाबत योग्य निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री या नात्याने आपण जाहिर करण्यात यावा अशी मागणी मा. आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.