गुरुद्वाराच्या दर्शनासाठी आलेले भाविक भीषण अपघातात जागीच ठार

0

 

यवतमाळ

 

अपघाताची मालिका थांबण्याचे नावच घेत नाहीये. समृद्धी महामार्गावर सात जनःच्या अपघाती मृत्यूची बातमी ताजी असतांनाच यवतमाळ नागपूर महामार्गावर आज सकाळी कार आणि ट्रकचा अपघात होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

पंजाब येथून नांदेड येथे गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात झाला. नांदेड येथे गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी हे भाविक जात होते. यवतमाळ नागपूर महामार्गावर चापरडा गावाजवळ एका ट्रकला त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडकली. ही धडक ऐवढी भीषण होती की जागेवरच गाडीतील चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेत कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताने जागेवर विद्रक चित्र निर्माण झाले होते. या घटनेची माहितीमिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य राबवले. त्यांनी जखमी नागरिकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

 

घटनास्थळी चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघातवेळी घटनास्थळी विदारक चित्र होते. चौकात रक्ताचा सडा पडला होता. तर गाडीचा चक्काचूर झाला होता. अपघात झाल्यावर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून येथील वाहतूक सुरळलीत केली.

 

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे समजू शकली नाही. हे सर्व जण इनोव्हा कारने नांदेडला जात होते. यावेळी त्यांची गाडी चारपडा गावाजवळ ट्रकला मागून धडकली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.