डंपरला ओव्हर टेक करणाऱ्या चोपडा- भार्डू बसचा अपघात

0

 

चोपडा, लोकशाही न्युज नेटवर्क 

ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात चहार्डी ते वेले रस्त्यावर गुरुवारी (ता. २०) सकाळी साडेअकरा ते दुपारी बाराच्या सुमारास चोपडा- भार्डू बस उलटली. या अपघातात दोन प्रवाशांसह चालक व वाहक जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी चोपडा-भार्डू बस (एमएच १४, बीटी २०८३) भार्डू येथून चहार्डीमार्गे चोपडा येथे परत येत होती. चहार्डी ते वेले गावादरम्यान कारखाना मेन गेटजवळपास मुरूमने भरलेला डंपर पुढे चालत असताना, बसचालकाने डंपरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. साईडपट्ट्यांवर मुरूम असल्याने बसची एक बाजू पूर्ण खोल भागात गेली व बस विरुद्ध दिशेला खड्ड्यात गेली.

आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, डंपरचालकाने साईड न दिल्याने बस उलटली. बसला क्रेनद्वारे बाहेर काढण्यात आले. बसमध्ये ३३ प्रवासी होते. दोन प्रवासी, चालक व वाहकाव्यतिरिक्त कुणालाही इजा झाली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.