कॅडबरी डेरीमिल्क मध्ये आढळल्या जिवंत अळ्या, पहा व्हिडिओ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जगात खूप कमी लोक असतात ज्यांना चॉकलेट आवडत नसेल. काही लोक तर चॉकलेट वेडे असतात. यात फक्त लहान मुलांनाच चॉकलेट आवडत असं नाही तर ते मोठ्यांनाही तेवढच आवडत. आपण कुणालाही एक चॉकलेट देऊन खुश करू शकतो. मात्र, कॅटबरीच्या क्षेत्रात मोठं नाव असलेल्या एका डेअरी मिल्कच्या एका कॅडबरीमध्ये अळी सापडल्याचा दावा एका ग्राहकाने केला आहे. या अळीचा व्हिडिओ त्या व्यक्तीने सोशल मीडिया एक्सवरती शेअर केला आहे. या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून, डेअरी मिल्कच्या एका कॅडबरीच्या गुणवत्तेवर काही युजर्स प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

 

जगात खूप कमी लोक असतात ज्यांना चॉकलेट आवडत नसेल. काही लोक तर चॉकलेटचे वेडे असतात. यात फक्त लहान मुलांनाच चॉकलेट आवडत असं नाही तर ते मोठ्यांनाही तेवढंच आवडत. आपण कुणालाही एक चॉकलेट देऊन खुश करू शकतो. मात्र, कॅडबरीच्या क्षेत्रात मोठं नाव असलेल्या एका डेअरी मिल्कच्या एका कॅडबरीमध्ये अळी सापडल्याचा दावा एका ग्राहकाने केला आहे. या अळीचा व्हिडीओ त्या व्यक्तीने सोशल मिडीया एक्सवरती शेअर केला आहे. या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून डेअरी मिल्कच्या एका कॅडबरीच्या गुणवत्तेवर काही युजर्स प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

सोशल मीडिया एक्सवर ही पोस्ट रॉबिन झॅकियस नावाच्या व्यक्तीने शेअर केली आहे. ही घटना हैद्राबादच्या अमीरपेटमधील रत्नदीप मेट्रोमध्ये घडल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. ““अमीनपेटमधील रत्नदीप मेट्रोमधून मी खरेदी केलेल्या कॅडबरी चॉकलेटमध्ये एक जिवंत अळी सापडली आहे. या अशा एक्स्पायरी डेट नजीक आलेल्या उत्पादनांची तपासणी करण्यासाठी कोणती यंत्रणा आहे का? आरोग्याच्या बाबतीतल्या या अक्षम्य हलगर्जीपणासाठी कोण जबाबदार आहे?” असा प्रश्न रॉबिन यांनी उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.