बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे 394 मीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम

0

मुंबई ;- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे 394 मीटर लांबीच्या इंटरमीडिएट बोगद्याचे (एडीआयटी) खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रातील बीकेसी ते शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार आहे.

26 मीटर खोल झुकलेल्या एडीआयटीमुळे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) द्वारे 3.3 किमी (अंदाजे) बोगद्याचे बांधकाम सुलभ होईल. ज्यामुळे दोन्ही बाजूंनी 1.6 मीटर (अंदाजे) बोगद्यासाठी एकाच वेळी प्रवेश मिळेल. बोगद्याच्या 21 किमी बांधकामापैकी 16 किमी टनेल बोरिंग मशिनद्वारे तर उर्वरित 5 किमी एनएटीएमद्वारे आहे.

एडीआयटीसाठी 6 डिसेंबर 2023 रोजी खोदकाम सुरू करण्यात आले असून 394 मीटर लांबीची संपूर्ण लांबी सहा महिन्यांच्या अल्पावधीत खोदण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली 27 हजार 515 किलो स्फोटकांचा वापर करून एकूण 214 नियंत्रित स्फोट करण्यात आले आणि सुरक्षित उत्खननासाठी उच्च दर्जाच्या उपकरणांचा वापर करण्यात आला.

अनेक मॉनिटरिंग उपकरणांचा वापर

बोगदा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व वास्तूंचे सुरक्षित उत्खनन व्हावे, यासाठी अनेक मॉनिटरिंग उपकरणांचा वापर केला जात आहे. या कामासाठी एसएसपी (सरफेस सेटलमेंट पॉइंट), ओडीएस (ऑप्टिकल डिस्प्लेसमेंट सेन्सर) किंवा दोन्ही अक्षातील विस्थापनासाठी टिल्ट मीटर, बीआरटी (टार्गेट/थ्रीडी टार्गेटप्रतिबिंबित करून), बोगद्याच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म ताणांसाठी स्ट्रेन गेज, पीक पार्टिकल व्हेलोसिटीसाठी सिस्मोग्राफ (पीपीव्ही) किंवा व्हायब्रेशन अँड सिस्मिक वेव्ह मॉनिटर ही उपकरणे वापरली जात आहेत.

बोगद्याचे काम वेगाने सुरू

महाराष्ट्र राज्यातील मुंबई बुलेट ट्रेन स्थानक ते शिळफाटा या 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. या बोगद्याचा 7 किमीचा (अंदाजे) भाग ठाणे खाडी (इंटरटाइडल झोन) येथे समुद्राखाली असेल. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच बोगदा उभारण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.