धक्कादायक; दोन सख्ख्या बहिण-भावाचा बुडून दुर्दैवी मृत्यू…

0

 

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील अल्हनवाडी येथे एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. शेततळ्यात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू झाला आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील अल्हनवाडी येथे शेततळ्यात बुडून भाऊ आणि बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पायल संदीप पांढरे (इयत्ता तिसरी) आणि सुरज संदीप पांढरे (इयत्ता दुसरी) अशी या दोघ मृत भाऊ बहिणीचे नावे आहेत.

दोघेही बहिण भाऊ निवासी आश्रम शाळेत शिक्षण घेत होते. आज दुपारी (शुक्रवार, २७ ऑक्टोंबर) शेततळ्यावर गेले असता ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.