बियाणे, खते, वाजवी दरात न मिळाल्यास तक्रार निराकरण केंद्रात लावा फोन

0

जळगाव,- खरीप हंगाम 2024 अंतर्गत जळगाव जिल्हयातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, पुरवठा, उपलब्धता वाजवी दरात विक्री यासंबंधीच्या तक्रारीबाबत निराकरण करण्यासाठी आज कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हा कृषी निवष्ठा उपलब्धता तक्रार निवारण कक्ष व टोल फ्री नंबर चे शुभारंभ करण्यात आले. सदर प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, मोहीम अधिकारी विजय पवार व कृषी विभागाचे अधिकारी / कर्मचारी कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी उपस्थित होते. टोल फ्री क्रमांक 7498192221 या क्रमांकावर तसेच कृषि विभागाच्या 0257-2239054 व 9834684620 यापैकी कोणत्याही दूरध्वनी क्रमांकावर तक्रारग्रस्त शेतकऱ्यांनी बियाणे उपलब्ध होत नसल्यास किंवा खते उपलब्ध होत असल्यास याबाबत कुठली तक्रार असल्यास सदर क्रमांक वर कॉल करावा त्या ठिकाणी कंट्रोल रुम तथा नियंत्रण कक्षातून आपणास मार्गदर्शन मिळेल व आपल्या समस्येबाबत संबंधित तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांना सूचना करण्यात येतील असे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सुरज जगताप यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००००

Leave A Reply

Your email address will not be published.