भुसावळ दुहेरी हत्याकांड : सातवा फरार संशयित जेरबंद

0

क्राईम, भुसावळब्रेकींग : भुसावळ दुहेरी हत्याकांडातील

भुसावळ, लोकशाही न्युज नेटवर्क

भुसावळमधील जुना सातारा भागात जुन्या वादातून माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनिल राखुंडे यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची घटना २९ मे रोजी रात्री ३० वाजता घडली होती. या दुहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरले होते.

याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आतापर्यंत सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील सातवा फरार आरोपी सोनू रायसिंग पंडीत रा. वाल्मिक नगर, भुसावळ याला २७ जून रोजी रात्री ११ वाजता भुसावळ बाजार सामिती आवारातून अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घटना घडली होती? 

भुसावळ शहराचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे २९ मे रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान भुसावळ शहरातील जुना सातारा रोडवरून रस्त्याने कारमधून येत होते. त्यावेळी जुन्या वादातून राजेश सूर्यवंशी व बंटी पथरोड यांच्या सांगण्यावरून काही हल्लेखोरांनी त्यांच्या कारचा रस्ता अडवून त्यांच्यावर गोळीबार केल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे भुसावळ शहर हादरले होते.

याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात पोलीसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर इतर मारेकरी फरार झाले आहे. फरार मधील सोनू रायसिंग पंडित रा. वाल्मीक नगर, भुसावळ हा आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भुसावळ शहरातील कृषी बाजार समितीच्या आवारात येत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गुरुवारी २७ जून रोजी रात्री ११ वाजता पथकाने सापळा रचून फरार आरोपी सोनू पंडित याला शिताफिने अटक केली. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची संख्या सातवर पोहचली आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या सुचनेनुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे पोहेकॉ रमण सुरळकर, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, अमर आढळे, प्रशांत लाड, प्रशांत सोनार, दिनेश कापडणे, राहुल भोई यांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.