भंडारी यांच्या ” शोध शिक्षणासह माणसांचा ” पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

0

जळगाव – केसीई सोसायटीच्या शालेय विभागाचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी लिहिलेल्या “शोध शिक्षणासह माणसांचा” या शैक्षणिक पुस्तकाचे शनिवारी दुपारी तीन वाजता ए.टी. झांबरे विद्यालयात प्रकाशन होणार आहे.

गेल्या नऊ वर्षापासून चंद्रकांत भंडारी “गल्ली तुमची, पालक सभा आमची” तसेच “कुटुंब तुमचे प्रबोधन आमचे” हे दोन शैक्षणिक पण बिन खर्चिक प्रयोग राबवीत आहे.त या कालावधीत त्यांनी तसेच त्यांची पत्नी सुनीता भंडारी यांनी जे विविध अनुभव घेतले त्यावर आधारित हे पुस्तक असून त्याचे प्रकाशन गुरुवर्य परशुराम विठ्ठल पाटील शाळेच्या माजी मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. जळगावच्या अथर्व प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले असून भंडारी यांचे हे सतरावे पुस्तक आहे तरी शिक्षण प्रेमींनी या कार्यक्रमास हजर राहावे असे आयोजकांनी कळवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.