भडगाव ते वाडे बस फेऱ्या बंद; प्रवाशांचे हाल. अशोक परदेशी यांचे भडगाव-पाचोरा आगार प्रमुखांना निवेदन… आंदोलनाचा ईशारा…

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

भडगाव – वाडे दरम्यान गावांच्या सर्वच बस फेऱ्या दिवाळी नंतर जवळपास ८ ते १० दिवसापासुन पाचोरा आगाराने अचानक बंद केलेल्या आहेत. या मार्गाने एकही बस सुरु नाही. ही प्रवाशांसाठी मोठी शोकांतीका आहे. जळगाव ते वाडे मुक्कामे बसही बंदच आहे. यामुळे प्रवाशांचे प्रवासासाठी मोठे हाल होत आहेत. तरी भडगाव ते वाडे दरम्यान गावांच्या बंद बस फेऱ्या पुर्ववत सुरु करण्यात याव्यात तसेच जळगाव ते वाडे ही मुक्कामे बस फेरीही तात्काळ सुरु करण्यात यावी, बस फेर्या तात्काळ सुरु न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल. या आशयाचे निवेदन वाडे येथील रहिवाशी अशोक परदेशी यांनी भडगाव व पाचोरा आगार प्रमुखांना  दिले आहे.

दिवाळी निमित्त गावोगावी नातेवाईक, मित्र परीवार आनंदाने एकत्र आलेले आहेत. शाळेला सुट्टया लागल्या म्हणजे शालेय बस फेऱ्या अचानक बंद केल्या जातात. भडगाव तालुक्यात वाडेसह काही गावांच्या मार्गाच्या शालेय बस तसेच भडगाव ते वाडे. जळगाव ते वाडे , भडगाव ते बोदर्डे, भडगाव ते बोरनार, भडगाव ते निंभोरा यासर्व बस फेऱ्या दिवाळी नंतर ८ ते १० दिवसापासुन पाचोरा आगाराने अचानक बंद केलेल्या आहेत. भडगाव ते वाडे दरम्यान एकही बस फेरी सुरु नाही. परीणामी भडगाव ते वाडेच्या जवळपास १४ ते १५ गावातील प्रवाशांना बस सेवेपासुन वंचित राहावे लागत आहे.

याबाबत भडगाव बसस्थानकात चौकशी केली असता भडगाव तालुक्यात शालेय सुट्या असल्याने व दिवाळीनिमित्त बसेस प्रवाशांसाठी पुणे, मुंबई यासह लांब पल्याच्या गावांना सोडण्यात आल्याचे सांगण्यात येते. मग भडगाव ते वाडे दरम्यान सर्व गावातील प्रवाशांनी व विदयार्थ्यांनी प्रवास कसा करावा? असा प्रश्न प्रवाशी वर्गातुन होत आहे. यामुळे प्रवाशी वर्गाची गैरसोय होत एस टी महामंडळाच्या कारभारा बाबत नाराजी व्यक्त होतांना दिसत आहे. तरी पाचोरा आगाराने भडगाव ते वाडे दरम्यान सर्व बंद झालेल्या बस फेऱ्या पुर्ववत व तात्काळ सुरु कराव्यात. प्रवाशांचे प्रवासाचे होणारे हाल थांबवावेत अन्यथा आम्ही आंदोलनाची भुमिका घेऊ. असे आवाहनही या निवेदनात नमुद केलेले आहे. या निवेदनावर अशोक परदेशी यांची सही आहे. भडगाव ते वाडे बस फेऱ्या सुरु झाल्यावर वाडे, टेकवाडे बुद्रुक, नावरे, बांबरुड प्र ब, गोंडगाव, दलवाडे,सावदे, घुसर्डी, लोण पिराचे, बोरनार, कनाशी, देव्हारी, बोदर्डे, कोठली, नवे वढधे, जुने वढधे, भडगाव यासह गावातील प्रवाशी व विद्यार्थ्यांना प्रवासासाठी पुर्वी प्रमाणे सोयीचे ठरणार आहे. असेही या गावांतील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, प्रवाशी, विदयार्थी, पालक वर्गातुन बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.