विसरलेली पर्स पोलिसांच्या सर्तकतेने मिळाली परत; भडगाव पोलिसांची कामगिरी

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

भुसावळ येथून काम आटपून हडपसर (पुणे) येथे आपल्या घरी परत जात असताना भडगाव तालुक्यांतील कजगाव येथे रसवंती वर उसाचा रस पिण्यासाठी थांबले व काही वेळानंतर पुण्याकडे निघाले. या वेळी महिलेकडे असलेली पर्स व त्यातील रोख रक्कम व महत्वाची कागदपत्रे असलेली पर्स त्या रसवंतीवर विसरले. त्या वेळी एकाने भडगाव पोलिस स्टेशनला ती पर्स आणली महिलेचा तपास काढत आज ती पर्स पुणे येथील महिलेकडे सपूर्त करण्यात आली. या मुळे हरवलेली पर्स मिळाल्याने महिलेच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

पुनम विजय बागुल रा. हडपसर, पुणे या भुसावळ कडून पुण्याला आपल्या खाजगी वाहनातून जात असताना भडगाव तालुक्यांतील कजगाव जवळील भोरर्टेक जवळ रसवंती वर रस पिण्यासाठी थांबले होते. काही वेळानंतर ते पुण्याकडे निघाले. या वेळी नजर चुकीने पुनम बागुल यांच्याकडील पर्स ते रसवंती वरच विसरले असता त्या ठिकाणीं ही पर्स कोणी तरी विसरले म्हणुन एकाने ती पर्स भडगाव पोलिस स्टेशनला आणली असता त्या पर्स मध्ये रोख रक्कम 7050 रू, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, महिलेचे ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड, व महत्वाची कागदपत्रे आढळून आली.

भडगाव पोलिस स्टेशनचे महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल पंचशीला निकम यांनी कागदपत्र द्वारे हडपसर पोलिस स्टेशनला संपर्क साधला व पुनम बागुल या महिलेची महिती घेत त्यांच्याशी संपर्क साधला असता महिलेला भडगाव पोलिस स्टेशनला बोलावले व त्यांना ती पर्स त्यातील रकमेसह सपुर्त करण्यात आली. या वेळी भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक राजेन्द्र पाटील, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल पंचशीला निकम, शामिना पठाण, राजू सोनवणे, प्रकाश गवळी, अल्पेश कुमावत, आदींसह कर्मचारी उपस्थित होते. या वेळी पुनम बागुल यांनी एका दिवसात पर्स चा तपास लाऊन सपूर्त केली म्हणुन भडगाव पोलिसांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.