कपाशी चोरणाऱ्याला भडगाव न्यायालयाने सुनावली शिक्षा

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

भडगाव (Bhadgaon) येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली एस मोरे यांनी आरोपी नामे नितिन बन्सीलाल पवार या आरोपीला भा.द.वि. कलम 379 अन्वेय दोषी धरून प्रोबेशन ऑफ अकेड ॲक्ट च्या कलम 3 अन्यये शिक्षा न देता / ताकीद देऊन सोडले तसेच यापुढे कोणताही गुन्हा करावयाचा नाही असा निकाल दिला. या बाबत अधिक माहिती अशी की, दि. 4/3/2010 रोजी फिर्यादी भगवान पाटील यांचे शेतातून तीन क्विंटल कपाशी अंदाजे किंमत नऊ हजार रूपये किमतीची कपाशी कोणीतरी चोरून नेल्याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. तपासा अंती आरोपी नितिन बन्सीलाल पवार याच्यावर कोर्टात दोषारोप पत्र दाखल केले होते. अभियोग पक्षातर्फे घटना शाबीत करणेकामी सहा साक्षीदारांचे साक्ष नोंदवण्यात आली होती. या नंतर शिक्षा सुनावण्यात आली. या बाबत भडगाव न्यायालयाचे सरकारी वकील ॲड. इरफान अहमद रंगरेज यांनी कामकाज पाहिले व त्यांना पैरवी अधिकारी पो.हे.काँ. रमन कंडारे व केस वॉच पो. हे कॉ. भाऊराव पाटील यांनी मदत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.