७५ वर्षानंतर गिरणा नदीवर तयार होणार पूल

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

शहरात तब्बल ७५ वर्षानंतर गिरणा नदीवर आझाद चौक ते पेठ हा पुल तयार होत आहे. या पुलामुळे मध्यवर्ती शहरातील रसातळा जाणारी बाजार पेठ फुुलण्यास मदत होणार आहे. पेेठ भागातील रहिवासी व शेतकरी बांधवचा तीन किलोमिटर चा फेरा वाचणार आहे. पुलाचे काम होईल की नाही या विषयी अनेक शंका उपस्थित केले जात होते. परंतु आमदार म्हणुन दिलेल्या आश्वासनाची आज पुर्तता करीत आहे. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. असे विचार आमदार कीशोर पाटील यानी मांडले. गिरणा नदीवर आझाद चौक ते पेेठ पुलाचे भुमिपुजन प्रसंगी बोलत ते होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी जि प सदस्य विकास पाटील, सुनिल देशमुख, लखीचंद पाटील, प्रतापराव पाटील, दत्तात्रय पवार, डाॅ. प्रमोद पाटील, विनायक देशमुख, सुनिल पाटील (जारगाव), युवराज पाटील, इम्रान अली सय्यद, अतुल पाटील, दादाभाऊ भोई, संतोष महाजन, अतुल परदेशी, सुभाष पाटील, जग्गु भोई, प्रविण येवले, आबा चौधरी, विजय चौधरी, बापु पाटील, श्रवण भोई, शितल सोमवंशी, संंरपंंच मोहन पाटील, नाना हडपे, नागेश वाघ, पप्पु पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी डी. एम. पाटील, बांधकाम ठेकेदार सह आदी मान्यवर उपस्थित होते.

गिरणा नदीवर १९५२ मध्ये एक पूल झाला होता. आज २०२३ म्हणंजे तब्बल ७५ वर्षानंतर या गिरणीवर भडगाव तालुक्यामध्ये तब्बल पाच पूल होत आहे. तेही किमान एक पुल १५ ते १८ करोड रुपये किमतीचा असे जवळपास १०० करोड रुपयाचे पुल तयार करीत आहे. या पुलांमुळे दळणवळण अत्यंत सोपे व सहज होणार आहे. इंग्रजांच्या काळाच्या नंतर गिरणा नदीवर हे पुल तयार करीत आहे. आपल्या पूर्वजांपासूनच १०० ते सव्वाशे वर्षापासूनची ही बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ रसातळाला जाताना दिसत होती. तसेच भडगाव मध्यवर्ती शहरातील जवळपास ७० टक्के वर्ग हा शेतकरी आहे. नदी पलीकडील बाजू भडगावकरांची ७० ते ८० टक्के शेती आहे. या प्रत्येकाला मोठा फेरा मारून तिकंडे जाणं हे प्रचंड त्रासदायक होतं. गिरणा नदीवर हा पूल चालू झाल्याने बाजारपेठ फुलण्यास तसेच तीन किलोमिटर चा फेरा कमी होण्यास मदत होणार आहे.

आज या शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर नगर परीषद मालकीची जागा असणे गरजेचे आहे. शहरातील सर्वच जागा राज्य सरकार, जिल्हा परीषद मालकीच्या आहे. भडगाव शहराला शहराचे रूप द्यायचे असेल तर स्वमालकीची जागा असली पाहिजे. त्या जागेमध्ये व्यापारी संकुल बांधता येतील. त्यात बेरोजगारांना रोजगार मिळेल. विविध व्यवसाय सुरु करता येईल. मात्र भडगाव शहरात १०५ कोटी रुपयाची पाणीपुरवठ्याची योजना ही मंजूर झाली असुन अंतिम टप्पात आहे. तळणी परीसरला सुशोभीकरण साठी पाच करोड रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. जेणेकरून शहरातला प्रत्येक नागरिक त्या ठीकाणी गेला म्हणजे विरंगुळा मिळेल. भडगाव शहरांमध्ये ९८ ओपन स्पेस डेव्हलपमेंट करण्यासाठी जवळपास १५ ते २० करोड रुपयांचा निधी आणला. आज भडगाव शहरातल्या शंभर टक्के ओपन स्पेस डेव्हलपमेंट होत आहे. असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रवीण महाजन यांनी केले.

असा असणार पुल
आझाद चौक ते पेेठ (गावठाण) या पुलासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरत्थान महभियानातुन २२ कोटी ६० लाख रुपये निधी मंजूर आहे. पुलाची लांबी जवळपास २१० मिटर असुन पुलावर १५ मिटर लांबीचे १४ गाळे आहेत. जवळपास साडेसात मीटर रुंदी या पुलाची रस्त्याची असणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजुस २०५ मिटर लांबीचा जोड रस्ता असणार आहे. आणि १७० मीटर लांबीची संरक्षण भिंत या दोघेही साईडने या ठिकाणी असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.