भडगाव येथे श्रीराम नवमी निमित्त रथ उत्सव नियोजनाची बैठक संपन्न

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

शहरात श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर रथ उत्सव साजरा करण्यासाठी नियोजनाची बैठक श्रीराम मंदिर बाजार चौक या ठिकाणी घेण्यात आली.दरवर्षी मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी साजरी केली जाते. यंदाही येत्या १८रोजी श्रीराम नवमी निमित्त रथ उस्तव नियोजनाची बैठक झाली. या वेळी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. श्रीराम नवमीनिमित्त कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली तसेच शहरातील गणेश मंडळ व दुर्गाउस्तव मंडळांनी समाजसेवी संस्था यांनी रथउत्सव साजरा करण्याच्या वेळी आपण आपले आरास, देखावे, लेझिम पथक, संसृतिक नृत्य, सजीव देखावे हे सादर करण्याचे असल्यास रथ उत्सव समिती यांच्याशी संपर्क साधावा. व श्रीराम नवमी शांततेत व भव्यदिव्य पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. दि.१ एप्रिल शनिवार (कमदा एकादशी) रोजी दुपारी चार वाजता भव्य रथ उत्सव साजरा केला जाणार असून या रथ उत्सवात सर्वांनी सामील होण्याचे आवाहन रथ उत्सव समिती अध्यक्ष युवराज तहसीलदार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.