भडगाव शहरात कडकडीत बंदला उत्सफुर्त प्रतिसाद

भडगाव तहसिलदारांना सर्व पक्षीय व व्यवसायधारकांचे निवेदन

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील गोंडगाव येथील आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन हत्या केल्याच्या निषेधार्त भडगाव शहरासह तालुक्यात गोंडगाव, कजगावसह काही गावांमध्ये दि. ५ रोजी शनिवारी सकाळपासुन दिवसभर शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला. या बालिकेवर अत्याचार करुन हत्या केल्याच्या निषेधार्त दि. ४ रोजी भडगाव तहसिलकार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विविध सामाजीक संघटना, राजकीय मंडळींनी दि. ५ रोजी भडगाव बंदचे आवाहन केले होते. या बंदच्या आव्हानाला साथ देत भडगाव शहरातील व्यापारी, हाॅटेल, दुकाने, मेडीकल अँसोसीएशन, सलुन दुकाने यासह विविध व्यावसायीक दुकानदारांनी उत्सफुर्त प्रतिसाद देत बंद पाळला.

शहरात रस्त्यांवर सकाळपासुन शुकशुकाट दिसुन आला. भडगाव बसस्टँड परीसरात बढेसह काॅम्पलेक्ससह इतर काॅम्पलेक्समधील दुकाने सर्वञ बंद दिसुन आली. भडगाव शहरासह तालुक्यातील विविध व्यापारी संघटनांमार्फत गोंडगाव येथील या घटनेचा निषेध करुन भडगाव तहसिलदार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. तसेच गोंडगाव, कजगाव यासह काही गावांनाही या घटनेच्या निषेधार्त बंद पाळण्यात आला.

भडगाव शहर तथा तालुका व्यापारी असोसिएशन यांनी स्वयंफुर्तीने ठेवला बंद
भडगाव तालुक्यातील गोंडगाव या गावी आठ वर्षे चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करून कुट्टीच्या ढिगाराखाली दाबून निर्दयीपणे हत्या करणाऱ्या नराधमास कोठारात कठोर कारवाई करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून या खटल्यासाठी ऍडव्होकेट उज्वल निकम यांचे नियुक्ती करावी. आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी यासाठी भडगाव शहर तसेच तालुक्यातून सर्व व्यापारी, मेडीकल असोसिएशन, किराणा असोसिएश, हातमजूर, हॉटेल असोसिएशन, सलून असोसिएशन, पान टपरी व्यावसायिक, सोनार असोसिएशन, आटोमोबाईल असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक व हार्डवेअर असोशियन, कापड असोशियन, फोटोग्राफर असोशियन व सर्व ग्राहक सेवा संघ अशा सर्व व्यापारी तसेच दुकानदार युनियन यांनी स्वयंपूर्णतेने आपापले व्यवसाय तसेच दुकाने बंद ठेवून या निंदनीय घटनेचा जाहीर निषेध केला व भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी व्यापारी संघटना पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.