दारु पिऊन शिवीगाळ करणे पडले महागात, आठ वर्षापूर्वीच्या गुन्ह्यात सहा आरोपींनी दोन वर्षांची शिक्षा

भडगाव न्यायालयाने सुनावली शिक्षा

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील पिचर्डे येथे आठ वर्षापूर्वी दारूच्या नशेत असताना आरोपी नं १ याने फिर्यादीच्या पत्नीला व भावजाई यांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना घडली होती. या बाबत भडगांव पोलीस स्टेशन ला फिर्यादी – ज्ञानेश्वर रमेश जाधव, वय २६ वर्षे रा. पिचर्डे ता. भडगांव यांनी फिर्याद दिल्यावरुन गुन्हा रजि. नं. ११५/२०१५ भा.द.वि. कलम ३२४,१४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६, ५१०, ४२७ प्रमाणे आरोपी- १) दिनकर केशव संसारे २) वना सागा मोरे ३) योगेश फुला मोरे ४) राजु दिनकर संसारे ५) बेबाबाई वना मोरे ६) कोकीळाबाई दिनकर संसारे सर्व रा. पिचर्डे ता. भडगांव यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या बाबत तत्कालिन नेमणुकीचे स.फौ. शालिग्राम बाजीराव पाटील यांनी दोषारोप पत्र सादर केले होते. सदर गुन्ह्यामधील आरोपीतांना सी.आर.पी.सी. २४८ (२) प्रमाणे भादवि कलम १४३, १४७, १४८, ३२३, ५०४, ५०६ अन्वये आरोपी नं. १ ते ६ यांनी भादवि १८६० चे कलम १४३ सह १४९ करिता प्रत्येकी ३ महिने साधा कारावासाची शिक्षा व प्रत्येकी रक्कम ५०० रुपये प्रमाणे द्रव्यदंडाची शिक्षा सुनविण्यात आली आहे. आरोपी यांनी दंड न भरल्यास १० दिवसाचा साधा कारावासाची शिक्षा, तसेच भादवि १४८, १४९, ३२३ प्रमाणे भादवि ३२४ सह कलम १४९ प्रत्येकी दोन वर्षे साधा कारावासाची शिक्षा आरोपी नं. १ ते ६ यांनी साक्षीदार यांना कलम ३५७ प्रमाणे एकत्रीत पणे ६०००/- रुपये नुकसान भरपाई निकालाचे तारखेपासुन ३० दिवसाचे आत देण्यात यावे. असा निकाल मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो. भडगांव श्रीमती एस.एस.चव्हाण मॅडम यांनी दिलेला असुन शिक्षा सुनावली आहे. याबाबत सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी वकिल मनोज माने यांनी काम पाहीले असुन पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधि.स.फौ. रमण प्यारेलाल कंडारे, केसवॉच- पो. कॉ भाऊराव पाटील यांनी साक्षीदार यांना मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.