Bajaj च्या ‘प्लॅटिना आणि पल्सर’वर मिळतेय भरघोस सूट; जाणून घ्या ऑफर्स

0

नवी दिल्ली  :  जुना स्टॉक क्लिअर करण्यासाठी कंपन्या विविध ऑफर्स देत असतात. 2020 मध्ये कोरोनाच्या (covid19) संकटात वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे कंपन्यांकडून आता विविध ऑफर्सच्या मदतीने हा जुना स्टॉक क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यविविध ऑफर्सच्या मदतीने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बजाजने देखील आपल्या प्लॅटिना (Platina )आणि पल्सर (Bajaj Pulsar) या दोन गाड्यांवर ऑफर्स दिल्या आहेत.

बजाजने आपल्या नवीन पल्सर 125 (Bajaj Pulsar 125) या मॉडेलवर भरघोस सूट दिली आहे. कंपनीने चार पल्सर मॉडेलपैकी 125 या मॉडेलवर कॅश डिस्काउंट (cash discount ) दिला आहे. पल्सर 125 चे चार मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध असून यात, Single seat drum, split seat drum, single seat disc आणि slit seat disc या मॉडेलचा समावेश आहे.

परंतु यात केवळ drum brake आणि Disc Brake वेरिएंटवर डिस्काउंट मिळणार आहे. यात 2 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार असून, केवळ 12,725 हजार रुपयांच्या डाऊनपेमेंटमध्ये ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता.

 

प्लॅटिनावरही ऑफर –

बजाजच्या सर्वात लोकप्रिय असलेल्या Bajaj Platina या गाडीवर मोठी सूट आहे. या गाडीच्या Platina 100 आणि Platina 110 H-Gear या दोन्ही वेरिएंटवर कॅश डिस्काउंट मिळतो आहे. यात बजाज Platina 100 वर 2800 रुपये तर Platina 110 H-Gear वर 2500 रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळणार आहे. या गाडीवर 5 वर्षाची गॅरंटीही मिळणार आहे.

 

सध्या या गाडीची किंमत देखील इतर गाड्यांच्या तुलनेत कमी आहे. Platina 100 ची किंमत 58,605 रुपये, तर Platina 110 H-Gear या किंमत 63,027 रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.