दिवसातून एक सफरचंद खा.. कित्येक आजार राहतील दूर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आपल्या खानपानावर आपले आरोग्य अवलंबून असते. म्हणून आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा यावर प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे. सफरचंद हे असं फळ आहे, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे केवळ भारतातच नव्हे तर, जगभरात सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ आहे. त्याच्या उत्कृष्ट गुणधर्मांमुळं काही तज्ज्ञ याला जादूचं फळदेखील म्हणतात. त्यात पुरेशा प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि रोगांशी लढणारे घटक असतात. चला तर मग जाणून घ्या सफरचंदाचे जबरदस्त फायदे.

सफरचंदातही असे काही घटक आढळतात, जे शरीरात नवीन पेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देतात. मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर आहे. तसंच, ते तुमच्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करू शकतं. सफरचंदाचे नियमित सेवन केल्यानं कर्करोगाचा धोका कमी होतो. सफरचंदाच्या नियमित सेवनानं टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी होतो.

सफरचंदात आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात. बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. मूतखड्याची समस्या टाळण्यासाठी तुम्ही रोज सकाळी सफरचंदाचं सेवन करू शकता. सफरचंदाच्या सेवनानं वृद्धत्वामुळं मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत होते.

सफरचंदातील फायबर तुमचे दात मजबूत ठेवण्यास मदत करतं. सफरचंद सेवन हृदयासाठी खूप चांगलं आहे. त्यामुळं बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही. सफरचंदाचा नियमित वापर वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो. सफरचंदाचा रस रोज सकाळी सेवन केल्यानं चेहऱ्यावरील पांढरे डाग कमी होतात.

आपण सफरचंद कधीही खाऊ शकतो. मात्र, सकाळी सफरचंदाचं खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा होतो. याचं कारण म्हणजे सफरचंदात फायबर आणि पेक्टिन मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळं रात्रीच्या वेळी याचं सेवन केल्यास ते पचण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळं सकाळची वेळ याचं सेवन करण्यासाठी सर्वोत्तम वेळ असू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.