शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या अल्फिया खालील सय्यदचा सत्कार

0

लोकशाही न्युज नेटवर्क
महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषदतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या अल्फिया खालील सय्यदचा सत्कार सोहळा झाला . जळगाव शहर महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 15 गेंदलाल मिल येथील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी अल्फिया खालील सय्यद हिने सन 2021-22 मध्ये घेतलेले पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 60 टक्के गुण मिळवून जिल्हास्तरावर 163 वा क्रमांक शहरी भागात 22 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. विद्यार्थिनी शहरी भागातील एकमेव विद्यार्थिनी आहे महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषदतर्फे जळगाव जिल्हा अध्यक्ष अब्दुल शकूर देशपांडे यांच्या हस्ते अल्फीया ला सन्मानचिन्ह मेडल प्रमाणपत्र व रोख 5001 रुपये रक्कम देण्यात आली .

तसेच लबॅक फाउंडेशन तर्फे तिचे शिक्षक सिराज इकबाल खान यांना पुष्पगुच्छ व श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले . शाळेचे मुख्याध्यापक असादुल्ला रहमतुल्ला शेख यांनी याचे श्रेय तिचे शिक्षक सिराज इकबाल खान यांना दिले आहे प्रशासन अधिकारी दिपाली पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
कार्यक्रमाला महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषदचे जिल्हाध्यक्ष अब्दुल शकूर देशपांडे उपाध्यक्ष राजीक नुरा पटेल , मुक्ती आरिफ पटेल तसेच हाफीस तौफिक व जळगाव शहर महानगरपालिकाचे नगरसेविका रुखसाना बबलू खान हनीफ सय्यद व युनू शेख आरिफ शेख राजिक सय्यद नजीर खान आसिफ खान आदी उपस्थित होते .

 

Leave A Reply

Your email address will not be published.