रिचार्ज प्लान तर महागलेच, वर डेटाचीही चोरी

एअरटेल युजर्सच्या डोक्याला ताप

0

 

नवी दिल्ली

 

एअरटेल युजर्ससाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एअरटेल युजर्सचा डेटा हॅक करुन तो विकला जात असल्याचे सांगण्यात येत असून एअरटेलने या घटनेला विरोध करत नकार दिला आहे. एअरटेलने आपल्या निवेदनात कोणाचाही डेटा हॅक न झाल्याचे म्हटले आहे.

 

हॅक झालेल्या डेटामध्ये युजर्सचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, कुटुंबाची माहिती, आधार कार्डची माहिती या गोष्टींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत असून एका सोशल मिडिया पोस्टद्वारे ही माहिती देण्यात आली होती. त्या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, xenZen एअरटेल युजर्सचा डेटा अनधिकृतपणे विकत आहे. ही डेटा डार्क वेबवर विकला जात आहे. ब्रीजफोरम नावाच्या समुदायामध्ये हा डेटा विकला जात आहे.जवळपास ३७५ मिलियन युजर्सचा डेटा हॅक झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. जून २०२४ मध्ये हा डेटा लीक झाला असून या माहितीत युजर्सची सर्व वैयक्तिक माहितीचा समावेश असण्याचे बोलले जात आहे.

 

दरम्यान एअरटेलने या ब्रीचचे वृत्त फेटाळले आहे. एअरटेलने सांगितले की, प्रारंभिक तपासणीच्या आधारे एअरटेलच्या सिस्टीममध्ये कोणताही डेटा चोरीला गेलेला नाही. याआधीही अनेक मोठ्या कंपन्यांचा डेटा चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. भारतीय ऑडिओ कंपनी boAt च्या ग्राहकांचा डेटा लीक झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.