आधार पॅन कार्ड लिंक केलंय का ? उरलेत अवघे दोन दिवस

0

नवी दिल्ली ;- नागरिकांना अनेकदा आधार आणि पॅन कार्ड जोडणीसंदर्भात संधी देण्यात आली. त्यानंतर दंड लावण्यात आला. तरी अजूनही अनेक नागरिकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आयकर विभागाने मंगळवारी नागरिकांना पुन्हा दोन्ही कार्डच्या लिंक जोडणीचे स्मरण करुन दिले.

31 मे 2024 रोजीपूर्वी दोन्ही कार्ड जोडणीचा आग्रह धरला आहे. आयकर खात्याने सोशल मीडिया हँडल X वर यासंबंधी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, या अंतिम मुदतीपर्यंत जे लोक हे काम करणार नाहीत. त्यांना उत्पन्नावर जादा टीडीएस कपातीचा सामना करावा लागेल.

प्राप्तिकर खात्याने नागरिकांना ट्विट करुन यासंबंधीची माहिती दिली आहे. “करदात्यांनी लक्ष द्या. 31 मे 2024 रोजीपूर्वी पॅन कार्ड, आधार कार्डशी लिंक केल्याने हे निश्चित होईल की, 31 मार्च 2024 पूर्वी करण्यात आलेल्या व्यवहारासाठी निष्क्रिय पॅनमुळे तुम्हाला आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 206एए आणि 206 सीसी अंतर्गत उत्पन्नावर उच्च कपातीचा सामना करावा लागणार नाही.” यापूर्वी 23 एप्रिल रोजी सुद्धा आयकर खात्याने दोन्ही कार्ड जोडणीची आठवण करुन दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.